नागपुरात ट्रक चालकाला छताला टांगून अमानुष मारहाण

नागपूर: नागपूरमध्ये काही लोकांकडून एका ट्रक चालकाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधीचा व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नागपूरच्या वडधामना परिसरातील आंध्रा-कर्नाटक रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या कार्यालयात रविवारी हा प्रकार घडला. संबंधित ट्रान्सपोर्ट एजन्सीने चार दिवसांपूर्वी पीडित ट्रक विक्की सुनील आगलावे या चालकाला ट्रकमध्ये लोड केलेले साहित्य ( ज्यामध्ये व्हॉल्वो बस चे काही पार्टस होते ) थिरुवनंतपुरमला पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. त्यासाठी विक्कीला रस्त्यातील टोल टेक्स आणि इतर खर्चासाठी ३५ हजार रोख रक्कम दिली होती. याशिवाय, १२ हजार रुपयांचे डिझेल ही भरून दिले होते.