कोल्हापूर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

कोल्हापूर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
Spread the love

कोल्हापूर :  कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे. या दोन्ही जिल्ह्यात नद्यांना पूर आल्याने पुराचा धोका वाढला आहे. नदी काठच्या गावांना आणि महाड, पोलादपूर येथेही भोंगा वाजवून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापुरात ५ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी होईल तर पुढील २४ तासात रायगडमध्येही अतिवृष्टी होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे.

रायगड जिल्ह्यात दक्षिण भागात आज दुपारपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली . महाडसह पोलादपूर , माणगाव , तळा , रोहा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाबरोबरच जोरदार वारे वाहत आहेत. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .  नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून डोलवहाळ बंधाऱ्यात कुंडलिका नदीचे पाणी  इशारा पातळी पर्यंत पोहोचले आहे . सततच्या पावसामुळे ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून नागरिक हैराण झाले आहेत . लावणीची कामे पूर्ण झाली असली तरी पाणी शेतात तुंबून राहिल्यास रोपे कुजण्याची भीती आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

Admin

Admin

9909969099
Right Click Disabled!