गढूळ पाण्यामुळे ठाणेकर जुलाब, उलट्यांनी हैराण

ठाणे : स्मार्ट शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या ठाणे महापालिकेपासून एक ते दीड किमीच्या अंतरावरील ज्ञानेश्वर नगर परिसरातील नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून अक्षरशः गढूळ पाणी प्यावे लागत आहे. विशेष म्हणजे हे गढूळ पाणी पिऊन या परिसरातील जवळपास ७० टक्के नागरिकांना जुलाब, उलट्या, ताप यासारखे आजार झाले असून आतापर्यंत या परिसरात डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हे गढूळ पाणी पिऊन या परिसरात असणाऱ्या प्रत्येक घरातील एक किंवा दोन सदस्य आजारी पडत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे . यावर त्वरित उपाय न केल्यास साथीचे आजार बळावण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे .
ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सध्या डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले असून ज्ञानेश्वर नगर परिसरातील एका मुलीचा नुकताच डेंग्यूने मृत्यू झाला आहे . या मुलीबरोबरच याच परिसरातील मोरे नामक व्यक्तीला देखील डेंग्यूची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे….